कट झालेल्या वायरच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू : पिलखोडची घटना

Youth of Pilkhod dies of shock चाळीसगाव : तालुक्यातील तामसवाडी येथे कट झालेल्या विजेच्या वायरला स्पर्श होवून पिलखोड येथील तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत रवींद्र सुरेश भिल्ल (25,पिलखोड ता. चाळीसगाव) या तरुणाचा मृत्यू झाला.

दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू
रवींद्र भिल्ल हा तामसवाडी येथे वेल्डींगच्या दुकानात कामावर असतांना गुरूवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी दुकानातील कट झालेल्या वायरला त्याचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रवींद्रचे दोन महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. त्याचे आई-वडील ऊस तोडणीचे काम करतात. या घटनेने भिल्ल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.