जळगाव : दुचाकीचा कट लागल्याचा कारणावरून महानगर पालिकेसमोर शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार भिडल्याची घटना घडली. यात एकाला तर काही तरूणांनी चांगलाच चोप दिल्याचे समजते.
वाल्मीक नगर येथील रहिवासी संतोष मधुकर तायडे हे मित्राच्या मुलास ला.ना. विद्यालयात सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. महानगरपालिकेजवळून जात असतांना रेल्वेस्टेशनकडून आलेल्या तरूणाने राँगसाईडने दुचाकी घालून महानगरपालिकेच्या दिशेने आला. यात संतोष तायडे यांच्या दुचाकीचा कट त्याला लागला. तरूणाने कट लागल्याच्या कारणावरून संतोष तायडे यांच्या वाद घातला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू असतांना तरूणाने तायडे यांच्या कानशिलात लगावली. दोघांमध्ये हाणामारी होताच परिसरात असलेल्या काही तरूणांना तायडे यांना कानशिलात लगावणार्या तरूणाला चांगलाच चोप दिला. काही वेळानंतर शहर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, काहीवेळा दोघांना माघार घेतल्याने याबाबत पोलीसात कोणतीही नोंद नाही. तरूण हा एका राजकीय व्यक्तीची भाऊ असल्याचे समजते.