कठीण परिश्रम हीच यशाची खरी गुरुकिल्ली

0

नगरदेवळा । कठीण परिश्रम हीच यशाची खरी गुरुकील्ली असून प्रत्येक विद्यार्थ्यास विद्यार्थी जीवनातच खरी शिस्त अंगी जडते असे विधान केंद्रप्रमुख चंद्रकांत मोराणकर यांनी केले. येथील ए.टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीसाठी आयोजित निरोप समारंभाच्या प्रमुख उपस्थितीत ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी कन्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेलार होत्या. तर व्यासपीठावर पालक प्रतिनिधी शिवाजीराव हरळ, श्री खैरनार, एम.एस. पाटील, सौ.कापडने, सौ.जाधव, आर.जे. राजपूत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात ईशस्तवन व सरस्वती पूजनाने झाली.

यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी उपस्थित नववीच्या विद्यार्थिनीनी पुष्पगुच्छ व पेढा भरवत 10 वी च्या विद्यार्थीनींना निरोप दिला. काही विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त करत शाळा व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.पवार यांनी तर आभार आर.जे.राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम.एस.पाटील, आर.डी. वाघ, आर.एच.सूर्यवंशी ,एम.एच.सोनवने, ए.बी. काटकर, जी.बी.चौधरी, एस.डी. वानखेडे, बी.एल.परदेशी, आर.एच.महाजन यांनी परिश्रम घेतले.