कठीन परसंगले तयार रहा: जिल्हाधिकाऱ्यांचा अहिराणीतून संदेश

0

नंदुरबार:सर्व खानदेशनी जनता करता आपली मायबोली अहिराणीमा आऊ निरोप शे…. गाव मा राहणारा लोकेस्नीले रिकामा बसापेक्षा ग्रामसेवक, सरपंचले भेटीसन मनरेगा ना काम करता पुढे या आणि पाऊस पडाना पहिले जास्तीत जास्त काम करा… पुढे कशा दिवस येतीन ते कोणलेच माहित नही शे…म्हनीसन प्रत्येक कठीन परसंग करता तयार राहा.. आणि सुखना राहा, असा जिल्हाधिकाऱ्यांनी अहिराणीतून संदेश दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बहुल समाज असल्यामुळे मोल मजुरीसाठी परप्रांतात जावे लागते. नंदुरबार जिल्ह्यात आतापावेतो मजूर वर्गासाठी कोणतेही ठोस उपाय योजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे मजुरीसाठी बाहेरील राज्यात दरवर्षी स्थलांतर व्हावे लागते ह्यावर्षी कोरोनामुळे मजुरीसाठी बाहेर राज्यातून गेलेले मजूर वर्ग परत आले असून त्यांच्या पुढे पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतु जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ह्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून थेट जनतेला आपल्या मायबोली अहिराणी भाषेतून संवाद साधत मनरेगातुन मोलमजुरीसाठी आवाहन केले.