कठुआ, उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ प्रतिकात्मक कँडल मार्च

0

शिरपूर । जम्मूमधील कठुआ ,उत्तर प्रदेशातील उन्नाव व सुरत मध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांमूळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या संतापाच्या लाटीचा परिणाम शहरात ही पहायला मिळाला. देशामध्ये माहिलां वरती होणार्‍या अत्याचाराच्या निषेध करण्यासाठी शिरपूर शहर वासियांतर्फे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. शहराच्या कुंभार टेक येथून मोर्चास सुरवात करण्यात आली.

अशा आहेत मागण्या
कँडल मार्चमध्ये शासन दरबारी विनंती करण्यात आली की,शासनाने बालात्काराच्या या जघन्य अपराधासाठी फाशीच्या शिक्षेचे प्रावधान करावे. महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी संविधानाच्या अखत्यारीत कडक कायदा करावा जेणे करून अशा प्रकारच्या घटना थांबतील.निर्भया फंडचा योग्यरीत्या विनियोग करावा . अशा प्रकारच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. कँडल मार्चच्या यशस्वितेसाठी मजहर पठाण, इब्राहिम शेख,मजहर अली,मोईन पठाण,पप्पू मुजावर,जमील पटवे,युनूस टेलर,शाहिद काश्मिरी,मोहसीन शेख,इमरान खान,तौसिफ राही,जुबेर मुजावर, अबरार खाटीक,मुद्दसिर सैय्यद, मोहसीन काश्मिरी,साबीर शेख,मुन्ना पठाण,अजहर मुजावर आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.मार्चच्या समारोप प्रसंगी लब्बैक फाऊंडेशन च्या वतीने मार्चमध्ये सहभागी सर्व नागरिक,सर्व संस्था,पोलीस प्रशासन,शिरपूर नगर परिषद कँडल मार्चच्या आयोजना साठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. कँडल मार्चचे सूत्रसंचलन मुन्ना सर व मजहर अलीयांनी केले.

फलकांद्वारे जनजागृती
हातात मेणबत्ती तसेच महिला सुरक्षा,बलात्कार्‍यांना कठोर शिक्षेची मागणी करणारे फलक घेऊन मोर्चेकर्‍यांनी आपला निषेध दर्शविला. कँडलमार्च मध्ये शिक्षण समिती सभापती हेमलता गवळी,आरोग्य सभापती नाजेरा बी कमरोद्दीन शेख ,शिक्षण समिती सभापती हेमलता गवळी,ज्येष्ठ शिक्षका,तब्बसुम कुरेशी, नगरसेविका मुमताज बी रज्जाक कुरेशी,सर्व नगरसेवक, नगरसेविका शिरपूर शहरातील असंख्य नागरिक ,विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.