भुसावळ- तालुक्यातील कठोरा बु.॥ येथे टेंट हाऊसला लागलेल्या आगीत दोन लाख 60 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात रामदास बाजीराव तायडे यांनी खबर दिली. कठोरा गावातील घरासमोर लग्न मंडप साहित्य ठेवण्याची खोली असून शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक्स मीटरची वायर जळाल्याने टेंट हाऊसला आग लागली. या आगीत दहा लग्न मंडप, दहा सिलिंग, दहा गाद्या, दहा पडदे, दोन सोफासेट, महाराजा खुर्च्या, एक पोते गहू व तांदूळ असे मिळून एक दोन लाख 60 हजारांचे नुकसान झाले. तपास नाईक मुकेश जाधव करीत आहेत.