नवी दिल्ली: कोरोनामुळे यंदाची आयपीएल होणार की नाही ? याबाबत अनिश्चितता होती. मात्र यंदाची आयपीएल यूएई (संयुक्त अरब अमिराती)मध्ये होणार आहे. आयपीएल होणार असल्याने चाहते खुश आहेत. दुसरीकडे आयपीएलमध्ये स्पॉन्सर म्हणून अनेक चीनी कंपन्यांचा समावेश आहे. परंतु यावर्षी चीन-भारत संबंध ताणले गेल्याने चीनी कंपन्यांवर बहिष्कार घालण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम आयपीएलवरही होणार आहे. चीनी कंपन्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत असतांना कंपनीने स्वत:च आयपीएलची स्पॉन्सरशिप रद्द केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचवेळी Vivo हे टायटल स्पॉन्सर असणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे रोष निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयपीएलवर बहिष्कार घाला, चिनी कंपनी Vivoवर बहिष्कार घाला असा ट्रेंड सुरू होता.