एरंडोल : तालुक्यातील कढोली गावातील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कढोली गावातील तरुणी बुधवार, 2 मार्च रात्री बेपत्ता झाल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेही आढळली नाही. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अल्पवयीन युवतीच्या आईने फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार राजेंद्र पाटील व जितेंद्र तायडे करीत आहेत.