मुंबई : बॉलीवूडची चिकणी चमेली म्हंटल कि कतरिना कैफचा सुरेख चेहरा डोळ्यांसमोर येतो. कतरिना कैफ ही अनेकांसाठी त्यांची स्वप्नसुंदरी आहे. पण, याला एक अपवाद आहे. कारण बॉलीवूडमध्ये एक असा सेलिब्रिटी आहे ज्याच्यासाठी कतरीना कैफ मोठ्या बहिणीप्रमाणे आहे.
आपल्या अनोख्या शैलीने हिंदी चित्रपटांतील संगीत विश्वात जागा मिळवणाऱ्या रॅपर बादशाह. बादशाह, त्याचे रॅप साँग आणि एकंदरच त्याचा वावर सध्या तरुणाईमध्ये चर्चेचा विषय आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या ऑडिओ चॅट शोच्या निमित्ताने बादशाहने या गोष्टीवरुन पडदा उचलला आहे.
९० च्या दशकातील आवडत्या अभिनेत्रीपासून ते अगदी हिंदी कलाविश्वातील आपल्या सुपरस्टार मोठ्या बहिणीपर्यंत बऱ्याच गोष्टींवर त्याने खुलेपणाने गप्पा मारल्या. बादशहसाठी मोठ्या बहिणीच्या स्थानी असणारी ती व्यक्ती म्हणजे कतरिना कैफ. ‘एका दौऱ्यावर असताना मला तिच्यात जणू एक मोठी बहीणच दिसली. मी तिला भेटलो त्याचवेळी माझ्या डोक्यात तिच्याविषयी एक वेगला दृष्टीकोन तयार झाला. ती सर्वांचीच खूप जास्त काळजी घेते’, असं बादशहा तिच्याविषयी म्हणाला.