कत्तलीच्या उद्देशाची गुरांची वाहतूक : सावद्यात 39 गुरांची सुटका

0

ट्रक चालक, क्लीनर पोलिसांना पाहताच पसार

भुसावळ- कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी सापळा रचून दहा चाकी ट्रक जप्त केला तर पोलिसांना पाहताच चालक व क्लीनर पसार होण्यात यशस्वी झाले. ट्रकमधून पोलिसांनी 39 गुरांची सुटका करण्यात आली असून या गुरांची खिरोद्यातील श्री हरी गो-शाळेत रवानगी करण्यात आली.

गुप्त माहितीनुसार सावदा पोलिसांची कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश आखाडे, महेश महाजन, देवेंद्र पाटील, प्रशांत चिरमाडे, बाळू मराठे, अनिल पारधी आदींनी सावदा गावाजवळील स्मशानभूमीजवळ ट्रक (एम.पी.09 एच.जी.0250) चा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. ट्रकमधून दोन लाख 41 हजार रुपये किंमतीच्या 39 गुरांची सुटका करण्यात आली. सावद्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतीक धांडे, डॉ.किशोर पाटील, डॉ.प्रशांत खाचणे, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.भालेराव, उमेश इंगळे, लक्ष्मण चौधरी यांनी गुरांवर उपचार केले. तपास उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश आखाडे करीत आहेत.