कत्तलीसाठी गुरे वाहून नेणार्‍या संशयितांना अटक

0

जळगाव । गुंगीचे औषध देवून कत्तलीसाठी औरंगाबादकडे जात असलेला 50 गुरांचा ट्रक 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री औद्योगिक वसाहत पोलिसांनी उमाळा घाटात पकडला. मात्र, घटनास्थळावरून ट्रक सोडून चालक व अन्य काही साथीदार फरार झाले होते. यानंतर पोलिसांनी ट्रक जप्त करून गुरांना पोलिसांनी बाफना गोशाळेत सोडले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय नाना सुर्यवंशी यांच्या पथकाने तीन संशयितांना शुक्रवारी रात्री अटक केली. यावेळी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशी घडली होती घटना
30 सप्टेंबर 2016 रोजी पोलीस निरिक्षक सुनील कुराडे यांना अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे कत्तलीसाठी गुरे जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पीएसआय नाना सुर्यवंशी, एपीआय सुनील आढावआदींच्या पथकाने अजिंठा चौफुलीजवळ सापळा रचला. पोलीसांनी कुसूंबा गावाजवळ ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला परंतू चालकाने ट्रक थांबविला नाही. चालक भरधाव वेगाने ट्रक घेवून चिंचोली मार्गे उमाळा फाटा कंडारी रोडने घेवून गेला. यादरम्यान चालकाने ट्रक एम.को.कंपनीजवळ उभा केला. व अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पसार झाला. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेत गुरांची सुटका करत बाफना गोशाळेत त्यांना सोडले होते.

तिघांना केली अटक
पोलीसांनी ट्रक व गुरे ताब्यात घेतल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यास सुरूवात केली. यानंतर पीएसआय नाना सुर्यवंशी यांना फरार संशयित हे मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित सलिम खॉ माम्मु खॉ वय-35 , अकबर खॉ मंजूरखॉ न्याहरगर, शंकरलाल भवरलाल ठाकूर वय-42 रा. यांना तिघांना रोजी रात्री अटक केली. तिघांना 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.