आरोपीस पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी ; 6 गोर्हे गोरक्षण निवार्यात रवाना
शिंदखेडा । तालूक्यातील बाभळे फाटयावर गाईच्या गोर्ह्यांना कत्तलीसाठी घेवून जाणारी अॅपे गाडी पकडण्यात शिंदखेडा पोलीसांना यश मिळाले. आरोपी बब्बू तेली यांस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.
पिकअप व्हॅन क्रमांक (एमएच 06 एजी 8508) गाईचे सहा गोर्हे शिरपूर कडून धुळयाकडे नेण्यात येत होते. सोनगीर येथे ड्यूटीवर असलेले पोलीस शिपाई रामदास पावरा यांनी या गाडीला थांबविण्यासाठी हात दिला मात्र गाडी थांबली नाही. पावरा यांनी याची माहिती चिमठाणे दूरक्षेत्राला दिली व गाडी बाभळे फाटयाजवळ पकडण्यात आली. गाडीची तपासणी केली असता त्यात सहा गोर्हे अतिशय क्रूरपणे कोंबल्याचे आढळून आले. पोलीसांनी चौकशी केली असता कत्तलीसाठी नेत असल्याचे पीक व्हॅनचा चालक बब्बू मझिद तेली याने सांगीतले. पोलीसांनी ड्रायव्हरसह सहा गोर्हे व गाडी ताब्यात घेतली. 2 लाख 66हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
गाडी पोलिसांच्या ताब्यात
आरोपी चालक बब्बू तेली यांस पाच दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. अधिक तपास चिमठाणे दूरक्षेत्राचे आर.एन.चव्हाण अधिक तपास करीत आहेत. ताब्यात घेतलेले सहा गोर्हे दोंडाईचा येथील आसाराम बापू यांच्या गो-रक्षण निवार्यात पाठविण्यात आले आहेत. सदर पिकव्हॅन शिरपूर तालूक्यातील भोरखेडा येथील असल्याचे समजते. ही गाडी पकडण्यासाठी भोरखेडा येथील गोरक्षा समितीचे सदस्य विशाल चव्हाण, जितेंद्र पाटिल, डॉ.योगेश पाटिल, विजय पवार, सागर पाटिल, अमोल पवार, पवन मराठे, गणेश शिंपी, चेतन राजपूत सहकार्य केल .