“कथा गंगाधर गाडगीऴांची” 17 ऑगस्टला झुनझुवालामध्ये

0

1944-45 च्या काळात मराठी कथा एका नव्या वळणावरून वाटचाल करू लागली , याचे श्रेय दिले जाते ते गंगाधर गाडगीळ , पु.भा.भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर यांनी…यापैकी गंगाधर गाडगीळ या असामी ने कथेच्या आविष्काराच्या वेगवेगळ्या वाटा दाखवत कथाविश्वात विविध प्रयोग निर्माण करण्याचा यत्न केला.. 25 आँगस्ट हा त्यांचा जन्मदिवस..त्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न कोमसाप युवाशक्ती काँलेजकट्ट्याचे तरूण “कथा गंगाधर गाडगीऴांची” या कार्यक्रमातून करीत आहोत. येत्या 17 आँगस्टला हा कट्टा घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.

यात विविध महाविद्यालयातील तरूण गंगाधर गाडगीळ यांच्या कथांचे अभिवाचन, नाटिकांचे अभिवाचन आणि सादरीकरण आत्मकथनातील उता-याचे सादरीकरण करणार आहेत.. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नाटककार श्री.विजय मोंडकर उपस्थित राहणार आहेत..त्यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या कथांवर आधारित ” कथा गंगेच्या धारा” या शीर्षकांतर्गत गंगाधर गाडगीळ यांच्या कथांचे दुरदर्शन मालिकांत रूपांतर केले होते…त्यासंदर्भात त्यांना आलेले विविध अनूभव ते कथन करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.