नवी दिल्ली-बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कामगार नेत्या सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्यावरील कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोमिला थापर, प्रभात पटनाई, सतीश देशपांडे आणि अन्य मंडळींनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर दुपारी ३.३० वाजता सुनावणी होणार आहे.