कनिष्ठ सहाय्यकास लाच घेतांना अटक

0

तळोदा। घरभाडे भत्ता बिल जमा करून दिल्यामुळे बक्षीस म्हणुन हजार रूपयांचे लाचेची मागणी केल्याप्रकरणी प्रतापपुर प्रथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक संजय भाईदास मराठे यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून पकडले व त्याच्यावर तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे याच विभागाचे कर्मचारी आहेत. यांच्याकडून ऑक्टोबर 2014 ते नोव्हेंबर 2015 पावेतो घरभाडे भत्ता 19 हजार 245 रु मंजूर करून ते खात्यावर जमा करून दिले. त्यापोटी बक्षिस म्हणून कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र प्रतापपुर (वर्ग 3)चे संजय भाईदास मराठे (वय 42) यांनी याबाबत 5 हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदार यांनी त्यांना 4 हजार रूपये खुशाली म्हणून दिले होते. मात्र 1000 रूपयांसाठी सातत्याने तगादा लावत असल्याने तक्रारदार यांनी याबाबत नंदुरबार लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

सापळा सचून केली कारवाई
संबंधीत विभागाने सापळा रचून काल दुपार दीड वाजे दरम्यान प्रतापपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यलयात संजय मराठे यांना लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पंच साक्षीदार संमेत रंगेहात पकडण्यात आले. सदर कामगिरी डॉ.पंजाबराव उगले, स.पो.उपायुक्त पो.अधीक्षक लाचलुचपत वीभाग नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पथकातील पो.उपअधीक्षक एस.टी. जाधव, पो.निरीक्षक संगीता पाटील, पो.ह.उत्तम महाजन, पो.कॉ. तांबोळी गढरी, परदेशी बोरसे व सहकार्‍यांनी केली आहे. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात लाच प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.