चाळीसगाव : कन्नड घाटाच्या मेन बत्तीजवळील खोलदरीत एका 42 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीचे ओळख पटवण्याचे आवाहन
चाळीसगाव-कन्नड दरम्यान असलेल्या कन्नड घाटातील मेन बत्तीजवळील पंधरा फूट खोल दरीत एका 42 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवार, 25 रोजी 1.30 वाजता आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक निरीक्षक हर्षा जाधव करीत आहेत.