कन्नड घाटात एसटी व ट्रक यांची समोरासमोर धडक

0

चाळीसगाव। औरंगाबादहुन धुळेकडे जात असलेल्या एसटी व चाळीसगावहुन कन्नड कडे जाणार्‍या ट्रक ची कन्नड घाटात शुक्रवारी 23 रोजी सायंकाळी 5.30 वाजता समोरा समोर धडक झाल्याने सदरच्या अपघातात 14 प्रवासी जखमी तर दोन प्रवासी यांना जबर मार लागला असुन जखमीना चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

औरंगाबाद आगाराची एसटी (एमएच 20 बीटी 2009) औरंगाबाद कंडुन चाळीसगाव कडे येत असतांना कन्नड घाटात चाळीसगांव कंडुन जात असलेल्या ट्रक चा घाटाच्या पायथ्याशी समोरा समोर झालेल्या अपघातात चौदा प्रवाश्यांना जखमी झाले असुन दोन वृद्ध महिला प्रवासी यांना जबर मार लागला आहे औरंगाबाद हुन चाळीसगांव कडे येत असलेल्या चाळीसगांव डेपोच्या एसटीने जखमी प्रवाशांना चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर त्यातील गंभीर जखमी वृद्ध महिलाना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आज सुदैवाने मोठा अणर्थ टळला असुन चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व नागरीकांनी गर्दी केली