जळगाव। पोलंड, पोर्तुगाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जियम या पाच युरोपियन देशातील प्रत्येकी एक विद्यापीठ व भारतातील पाच विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या इरास्मस प्लस या युरोपियन देशांच्या योजनेद्वारे सुमारे सात कोटी एवढया निधीतून साकारणार्या कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
गेल्या एक वर्षापासून माजी कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन व डॉ.जे.एस.सरदार हे सातत्याने कॅबसीन या कन्सोर्टियम प्रस्तावाबद्दल पाठपुरावा करत होते. या प्रकल्पाची निवड ब्रुसेल येथे इरास्मस फंडींगसाठी 745 पौकी गुणवत्तेच्या आधारे 127 प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध झाला. ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी वेब प्लॉटफॉर्म विकसित होणार आहे.