बोदवड- नफ्याने केलेल्या शेतावर ट्रॅक्टर फिरवून शेतकर्याच्या पायास ट्रॅक्टरची धडक दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल उर्फ दशरथ भगवान गायकवाड (जामठी, ता.बोदवड) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत वासुदेव भगवान गायकवाड व कृष्णा समाधान गायकवाड (जामठी, ता.बोदवड) यांनी 1 जुलै सकाळी 11 वाजता जामठी शिवारातील गट नंबर 34 मध्ये शेतातील कपाशी पिकावर ट्रॅक्टर-रोटोव्हेटर फिरवून पिकांचे नुकसान केले तर तक्रारदार त्यास अडवण्यासाठी गेला असता त्याच्या पायास धडक दिल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात तक्रारदारावर उपचार सुरू असल्याने जवाब आल्यानंतर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वासुदेव गायकवाड यांचे शेत तक्रारदार अमोल गायकवाड यांनी नफ्याने केले आहे. तपास हवालदार विजेश पाटील, संदीप वानखेडे, मुकेश पाटील करीत आहेत.