कपिल आणि सुनीलला एकत्र आणण्यात सलमान अयशस्वी

0

मुंबई : कॉमेडीचे दोन दिग्गज सुनील ग्रोवर आणि कपिल शर्माच्या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. मात्र, काही वादांमुळे सुनील ग्रोवरने शोमधून एक्झिट घेतली होती. त्यामुळे आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने सुनीलकडे पुन्हा एकदा विचारणा केली असता सुनीलने बिझी वेळापत्रकाचे कारण देत नकार दिला आहे.

कपिल शर्माच्या नव्या शोची निर्मिती सलमान खान करणार आहे. मात्र सुनीलच्या नाकारणे पुन्हा या शोवर काही परिणाम होईल का पाहावे लागणार आणि कपिल प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार.