नवी दिल्ली-भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मात्र आता कपिल देव हे क्रिकेट नाही तर गोल्फच्या मैदानावर उतरणार आहेत. जपानमध्ये १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशिया पॅसिफिक सिनिअर २०१८ स्पर्धेसाठी कपिल देव यांची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. रिशी नरिन आणि अमित लुथरा या खेळाडूंसोबत कपिल देव गोल्फच्या मैदानात उतरताना दिसतील.
आशिया पॅसिफिक सिनिअर २०१८ ही स्पर्धा ५५ वयाच्या पुढील खेळाडूंसाठी भरवली जाते. क्रिकेटमध्ये निवृत्ती स्विकारल्यानंतर मी पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. एक खेळाडू म्हणून या गोष्टीचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रीया कपिल देव यांनी दिली आहे.