Three Youths Of Vaijapur Were killed in a horrific Accident Involving a Pick-up Bolero Vehicle in Chopda Taluka चोपडा : कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी निघालेल्या वैजापूरच्या तरुणांच्या वाहनाला मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामठी गावाजवळ रात्री भीषण अपघात झाल्याने तीन तरुण ठार झाले असून सहा तरुण जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर एकाची रस्त्यातच प्राणज्योत मालवली.
तीन वेळा उलटले वाहन
आंबा अवतार येथे कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअप गार्डने वैजापूरहून तरुण पिकअप बोलेरोद्वारे निघाल्यानंतर जामठी गावाजवळ अपघात झाला. वाहन भरधाव वेगात असल्याने तब्बल तीनवेळा पलटी झाल्यामुळे निलेश शांतीवाल बारेला, जगदीश बारेला हे जागीच ठार झाले तर एकास जळगाव येथे हलवत असताना एकाची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. या अपघात एकूण तीन जण मयत झाले असून दोघे जबर जखमी झाले आहेत. त्यातील राहुल संजय बारेला याला जळगाव येथील न्युकलेस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तर विवेक बारेला याला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
जखमींवर वैजापूरात उपचार
परशुराम नाश्या बारेला, दिलीप बारेला, राहुल सरदार बारेला यांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग होणार आहे.