छिंदवाडा-मध्यप्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. याता यापुढे मुख्यमंत्री किंवा मंत्री एखाद्या योजनेबाबत घोषणा करणार नाही तर अधिकारी घोषणा करतील असे सांगतिले आहे. अधिकाऱ्यांनी योजनेबाबत घोषणा केल्यास जनता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहे.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ते काल पहिल्यांदाच छिंदवाडा या त्यांच्या बालेकिल्ल्याच्या भेटीवर होते. यावेळी त्यांनी औपचारिकरित्या तेथील जिल्हाधिकारी यांनी काही योजनांची घोषणा देखील केली.
छिंदवाडा मतदार संघातील काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यावर कमलनाथ यांनी छिंदवाडातील प्रत्येक नागरिक मंत्री आहे असे सांगितले.