चेन्नई : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकात आणि कमल हसन यांच्या तामिळनाडूमधील राजकीय प्रवेशामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कमल हसन यांनी रजनीकांतची त्याच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकत्र जेवणही घेतले.
या भेटीनंतर तामिळनाडू राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही राजकीय भेट नसल्याचे कमल हसन याने म्हटले आहे. तर रजनीकांत यांनी कमल हसन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली होती. रजनीकांत हे भगवे राजकारण करीत असून, ते भाजपकडे झुकलेले असल्याने त्यांच्याशी युती करणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले होते.