कमी धान्य दिल्याने लहान कडवान येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द

0

नंदुरबार। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नवापूर तालुक्यात लहान कडवान येथील सतीश गावीत यांचे स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी आदेशान्वये रद्द केले आहे.
या स्वस्त धान्य दुकानातील दुकानदार नियमापेक्षा कमी धान्य देत असल्याचे व त्यासाठी अधिक रक्कम घेत असल्याबाबत चित्रफीत पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली होती. या चित्रफीतीत ग्राहकांच्या शंकाचे समाधान करण्याऐवजी त्याच चित्रीकरण करण्यास दुकानदाराने विरोध केला असल्याचे दिसून येत आहे. या चित्रफीतीची शहानिशा करून पुरवठा विभागामार्फत दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसीलदारांनी दुकान नजीकच्या दुकानास जोडण्याची कार्यवाही करावी व एप्रिल 2020 चे धान्य ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांसमक्ष वाटप करावे,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.