करगाव येथे तिघांना मारहाण

0

*८ जणांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा*
चाळीसगाव – पत्री शेड खाली करण्याच्या वादावरुन ८ जणांनी तिघांना मारहाण केल्याची घटना दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान तालुक्यातील करगाव तांडा क्रमांक १ मध्ये घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर छगन चव्हाण (२७) रा करगाव तांडा नंबर १ यांच्या ताब्यात असलेले पत्री शेड खाली करावे या कारणावरुन २७ ऑगस्ट रोजी करगाव तांडा नंबर १ येथे दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान आरोपी ज्योतिसींग हरी पवार, उमेश हरी पवार, गणदीप हरी पवार, जयदीप अशोक पवार, अशोक हरी पवार, माधुरी उमेश पवार, लताबाई अशोक पवार, शिरीबाई रमेश पवार सर्व रा करगाव तांडा नंबर १ ता चाळीसगाव यांनी गैरकायदा मंडळी जमवुन फिर्यादी ज्ञानेश्वर छगन चव्हाण त्यांची पत्नी राधाबाई व आजी केसरीबाई यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण केली तसेच आरोपी ज्योतिसींग हरी पवार याने हातातील लोखंडी रॉड व उमेश हरी पवार याने काठी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वरील ८ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सहाय्यक फौजदार संजय पंजे करीत आहेत.