मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त होऊन आता बरेच महिने झाले. एकीकडे अरबाजनं त्याच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे तर दुसरीकडे मलायका मात्र जपून पावलं उचलत आहे. मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा वर्षभरापासून होत्या पण, दोघांनीही आपलं नातं सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांनीही आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगायला सुरूवात केली आहे.
मलायकाने आमिर खानसोबत नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आली होती. शोमध्ये येताना आमिर आणि करणने मलायकाचा हात धरत तिचं स्वागत केलं. ‘लवकरच तुझं असं कोणीतही स्वागत करणार आहे, हे असंच तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे,’ असं करणने त्यावेळी म्हटलं. मलायकाने लगेच त्याला आता काही नको बोलू म्हणत गप्प केलं. त्यामुळे अर्जुन- मलायकाच्या लग्नाचे संकेतच करणने दिले असं म्हणायला हरकत नाही.