नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील करदात्यांसाठी एक नवीन योजना सुरु करणार आहेत. याची उद्या गुरुवारी १३ रोजी मोठी घोषणा होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा ‘ट्रान्सपरंट टॅक्सेशन- ऑनिरिंग द हॉनेस्ट’ नावाची योजना लाँच करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्वीट केले आहे.
या प्लॅटफॉर्मची सुरुवात प्रत्यक्ष कर सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध उद्योग मंडळांचे प्रतिनिधी, ट्रेड असोसिएशन, सीए असोसिएशन आणि करदाते देखील भाग घेतील.
PM @narendramodi to launch the platform for “Transparent Taxation – Honoring the Honest” on 13th August 2020.https://t.co/ZEsJFfbeUn
via NaMo App pic.twitter.com/Ep91rc2Ovg
— PMO India (@PMOIndia) August 12, 2020
१ फेब्रुवारीला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टरची घोषणा झाली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधीही करदाते देशाचे निर्माते आहेत. सरकार त्यांच्यासाठी गिफ्ट देणार आहे असे म्हटले होते.
इंडस्ट्रीला अधिकाधिक स्पर्धात्मक बनविण्याचा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या अभियानाचा हिस्सा आहे. हे पॅकेज पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेनंतरची मोठी घोषणा ठरणार आहे. याआधी आणल्या गेलेल्या योजना कोरोनाच्या झटक्यापासून इंडस्ट्रीला वाचविण्यासाठी होत्या. आता अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय अन्य काही घोषणाही करण्याची शक्यता आहे.