करवंद नाका येथे सव्वा लाखांचा गुटखा जप्त ; एक ताब्यात

0

शिरपूर। शहरातील करवंद नाक्याजवळ एका संशयित वाहनाला थांबविले असता त्यात सव्वा लाख रूपये किंमतीचा विमल पानमसाला गुटखा व तंबाखू मिळून आल्याची घटना घडली. गाडीसह चालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 14 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली.

येथील नगरपालिकेचे अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदभाई चावडा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी करवंद नाक्याजवळील रिक्षा स्टॉपजवळ सापळा रचला. काही वेळातच कळमसरे गावाकडून शहरात मारोती ओमनी गाडी क्र. एमएच 18 डब्ल्यू 385 ला थांबविले. यानंतर गाडी चालक समाधान पुंडलिक पाटील(रा. अंजदे-होथनांथे) याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर गाडीमध्ये विमल पानमसाला गुटखा व तंबाखूच्या 1300 पॅकेटस् मिळून आल्यात. सदर पुड्या 1 लाख 32 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त एल. ए. दराडे यांच्या कडे अधिक चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे.