पहूर , ता . जामनेर (वार्ताहर ) : – पहूर येथील मार्शल आर्ट अॅन्ड स्पोर्ट ॲकडमीच्या कराटेपटूंनी येलो बेल्ट परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून मुलींनी बाजी मारली आहे .
गेल्या १६ वर्षांपासून कराटे प्रशिक्षक हरिभाऊ राऊत विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देत आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकविला असून सैन्य दल , पोलीस दलातही अनेक माजी विद्यार्थी यशस्वीरित्या सेवा देत आहेत .
मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या बेल्ट परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केले . यात नवल कोडें ग्रीन बेल्ट A ग्रेड , ईश्वर क्षिरसागर ग्रीन बेल्ट A ग्रेड , हरिष घाटे ग्रीन बेल्ट B ग्रेड , यश राऊत ऑरेंज बेल्ट ग्रेड B ,शेख इजराईल येलो बेल्ट A ग्रेड , गौरी कुमावत येलो बेल्ट A ग्रेड , आकांक्षा जाधव येलो बेल्ट A ग्रेड , निकीता घोंगडे येलो बेल्ट A ग्रेड , वैष्णवी सोनवणे यलो बेल्ट Aग्रेड ,वैष्णवी घोंगडे येलो बेल्ट A ग्रेड , नंदीणी सोनवणे येलो बेल्ट A ग्रेड , तृप्ती घोंगडे येलो बेल्ट A ग्रेड , कार्तिक सोनवणे येलो बेल्ट A ग्रेड , सतिष क्षिरसागर येलो बेल्ट A ग्रेड , गौरव गव्हाळे येलो बेल्ट A ग्रेड , हितेश पवार येलो बेल्ट A ग्रेड , वेदांत क्षिरसागर येलो बेल्ट A ग्रेड ,
अनिकेत माळी येलो बेल्ट A ग्रेड , हर्षल उदमले येलो बेल्ट A ग्रेड , सुमित चौधरी येलो बेल्ट A ग्रेड , सौरभ कोंडे येलो बेल्ट A ग्रेड , आशिष लोहार येलो बेल्ट A ग्रेड , अजय घोंगडे येलो बेल्ट A ग्रेड ,दिनेश राऊत येलो बेल्ट A ग्रेड , धनंजय सोनवणे येलो बेल्ट B ग्रेड या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह यश संपादित केले . त्यांना कराटे प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सर्व गूणवंत विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे .