मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे अनेक खुलासे होत असतात. अलीकडेच बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची मुलगी साराह अली खानने हजेरी लावली.
सैफने करिना कपूरसोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला पत्र लिहिले असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘मी जेव्हा करिनासोबत लग्न करणार होतो, तेव्हा मी अमृताला एकदा पत्र लिहायला पाहिजे असे वाटले. पत्रात लिहिले, हि नवीन आयुषाशाची सुरवात आहे. आपला एक चांगला इतिहास आहे आणि आपल्याला तो नेहमी आठवणीत ठेवायला पाहिजे. मी जेव्हा ही नोट करिनाला दाखविली तेव्हा तीही म्हणाली खूप छान लिहिले आहेस. अमृताला हे पत्र पाठविले तेव्हा मला साराहचा फोन आला. साराह म्हणाली, तुमच्या लग्नात तसं पण मी येणार होते पण आता मी आनंदी होऊन येईल. यानंतर आमचं पूर्ण कुटुंब एकत्र झाला आणि आमच्यात काहीही अडचण नाही आहे.’
सारा म्हणाली, जेव्हा वडिलांचे लग्न होतं तेव्हा स्वतःची आई अमृताने तिला तयार करुन पाठविले होतं.