मुंबई : बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आता वेब सिरीज मध्ये झळकणार आहे. मात्र यासाठी एक अट घातली आहे. वेब सिरीज जर ‘सेक्रेड गेम्स’ सारखी असेल तरच काम करणार असल्याचे तिने म्हटलंय.
”जर वेब सिरीजचा आशय ‘सेक्रेड गेम्स’सारखा असेल तर काम करण्यास माझी काहीच हरकत नाही. या सिरीजने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. या प्रकारचा वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या कलाकारांनी काम केले होते, ते मजेदार होते.”असे करीना म्हणाली.