मुंबई। पारंपारिक शत्रु पाकला 124 धावांच्या फरकाने भारताने पराभूत केल्यानंतर भारताचा विश्वास वाढला मात्र श्रीलंकेविरूध्द भारताची गोलंदाजी तोडगी ठरली. कोणताही गोलंदाज धावा रोखू शकला नाही.तर स्वत: कर्णधार विराट कोहली याने चेडू टाकून नविन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी झाला.त्यामुळे शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरूध्द असून तो सामना भारतासाठी करो या मरो असणार त्यासामन्यासाठी विराट हा अश्विनचा विचार करू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.कारण अश्विन हा अनुभवी ऑफ स्पिनर असून तो फलंदाजाला बांधून ठेवू शकतो.आणि तो वेळ पडल्यास धावाही काढू शकतो असा अश्विन शेवटच्या सामन्यात इलेव्हन इडियाचा सदस्य असणार की नाही हे फक्त विराटच ठरविणार …
विराटने अश्विनचे केले होते कौतुक
दक्षिण अफ्रिका संघ हा फिरकीसमोर कमकुवत आहे.हे गणित लक्षात घेतले तर रविवारी होणार्या करो या मरो या सामन्यात अनुभवी अश्विनला संघात स्थान देवू शकतो.विराट हा नवा प्रयोग करणार का? हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांतील अश्विनची कामगिरी पाहता त्याला आगामी सामन्यात संधी मिळू शकते.लंकेच्या सामन्यापुर्वी विराटने अश्विनचे तोंडभरुन कौतुक केले होते. अश्विन हा एक प्रतिभावंत गोलंदाज असून, संघाच्या भल्यासाठी प्लेइंग इलेव्हन कोणते असावे, याची त्याला चांगलीच कल्पना आहे. संघाचे हित लक्षात घेऊनच त्याने बाहेर बसणे पसंत केले, असे विराट म्हणाला होता. आगामी सामन्यात अश्विनला संघात संधी द्यायची झाल्यास रवींद्र जाडेजाला बाहेर बसावे लागू शकते. श्रीलंकेविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान टिकवणे भारतीय संघासाठी मुश्किल झाले आहे. ज्याप्रमाणे सलामीच्या सामन्यात दमदार विजय मिळवला.