कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची गळफास

0

एरंडोल । तालुक्यातील चोरटक्की येथील पंचेचाळीस वर्षीय शेतकर्‍याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी 20 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रिंगणगाव रस्त्यावरील टेकडीजवळ घडली. याबाबत माहिती अशी,की विखरणचोरटक्की येथील युवा शेतकरी हरी दिगंबर पाटील(वय45) यांचेकडे चार एकर कोरडवाहू शेती होती. दरवर्षी शेतीत होणारे नुकसान यामुळे त्यांचेकडे सोसायटीचे तसेच खासगी सावकारांचे कर्ज होते. पाटील यांच्या दोन मुली लग्नासारख्या होत्या.

शेतीत होणारे नुकसान, वाढलेले कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या हरी पाटील यांनी 20 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रिंगणगाव रस्त्यावरील प्रभाकर पाटील यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्त्याग्रस्त शेतकरी हरी पाटील यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांचेसह राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याबाबत पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार सुधाकर लहारे, महेंद्र पाटील तपास करीत आहे.