शिंदखेडा । दरखेडा येथील शेतकरी दगडू आनंदा पवार वय 67 यांनी बुधवार 21 जून रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दूपारी एकच्या सूमारास ही घटना लक्षात आली. कूटूंबायांनी त्यांना उपचारासाठी धूळे येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.स्वतःची तिन एकर शेती वर्षानूवर्षे तोट्यात असून त्यांनी यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेवर विविध कार्यकारी सोसायटीसह काही नातलगांकडून दिड ते दोन लाख रूपयावर कर्ज घेतले. आणि शेतीची मशागत करून पेरणी केली. परंतु, पेरणी पून्हा पावसाअभावी वाया गेली. दूबार पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पत्नी, मूलगा, सून, नातवंडे सार्वांचे पोट शेतीवरच अवलंबून असल्याने त्यांनी दूबार पेरणीसाठी पैसे कसे जमवयाचे या विवेंचनेत असतांना त्यांनी घराच्या गच्चीवर जात विषारी औषध सेवन केले. यानंतर खाली आल्यावर त्यांचे शेजारी पुरूषोत्तम पाटील यांना पवार यांच्या तोंडाचा घाण वास आला. यावर पवार यांनी विषारी औषध घेतल्याचे मान्य केल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.