कर्जमाफीअभावी शेतकर्‍याने दिला आत्महत्येचा इशारा

0

यावल- तालुक्यातील मनवेल येथील वि.का.सो.कडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शासनाकडून जाहीर झालेल्या कर्ज माफीसाठी टाळाटाळ केली जात आहे. यामुळे 15 दिवसाच्या आत कर्ज माफीचा लाभ न मिळाल्यास शेतकरी चिंधु पाटील यांनी आत्महत्येचा वि.का.सो.चेअरमन यांना लेखी पत्रकाने इशारा दिला आहे. शेतकरी चिंधू पाटील यांनी वि.का.सो.कडून कर्ज घेतले होते मात्र शेतीच्या हंगामाअभावी कर्जाची थकबाकी झाली तर कर्ज माफीस पात्र असूनही कर्ज माफीच्या यादीत समावेश झाला नसल्याने वि.का.सो.कडून नवीन कर्ज मिळत उसनवारीने पैसे घेऊन शेतीसाठी बी-बियाणे घेतले आहे तर खते घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे परीस्थिती गंभीर झाली असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक व वि.का.सो.चेअरमन यांना दिलेल्या पत्रकात दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.