कर्जाचा गैरव्यवहार करणार्‍या एकास अटक

0

जळगाव । वसंतराव नाईक विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर करून त्यांची परतफेड न करणार्‍या तिघांविरूध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रामानंद पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वसंतराव नाईक विकास महामंडळाकडून बाबुलाल भिका चव्हाण, गोपाळ देवीदास राठोड, ईश्‍वर रंगलाल पवार या तिघांनी एकूण सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्या रकमेत व्यवसाय सुरू केला नाही. शिवाय 2016 पर्यंत कर्जाचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे अखेर तिघांविरूध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामानंदनगर पोलिसांनी यातील बाबुलाल भिका चव्हाण या संशयिताला अटक केली आहे.