कर्जाचा ताण असह्य, हरताळ्यात शेतकर्‍याने घेतला गळफास

0
मुक्ताईनगर :- तालुक्यातील हरताळे येथील शेतकरी जगन्नाथ कृष्णाजी चौधरी (55) यांनी कर्जाचा ताण असह्य झाल्याने आत्महत्या केली. मंगळवारी ही घटना घडली. या घटनेने या परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीदेखील घरात फाशी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र कुटुंबियांच्या सतर्कतेने त्यांचे प्राण वाचले.
चौधरी यांच्यावर कर्ज होते शिवाय कर्जमाफी न झाल्याने ते विवंचनेत असल्याचे सांगण्यात आले. माजी उपसरपंच धर्मा चौधरी यांचे ते लहान भाऊ तर माजी सरपंच विश्‍वनाथ चौधरी यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परीवार आहे.