कर्जाचा हप्ता भरू नका सांगितल्यानंतर त्यावर व्याज का?: सर्वोच्च न्यायालयाचा बँकांना सवाल 

0

नवी दिल्ली:- देशात कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून संपुर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे उत्पन्न बंद झालं आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जाचे हफ्ते ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र वसूल केलं जाणार आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तीन महिने कर्जाचा हप्ता भरू नका असं सांगता, मग त्यावर व्याज कसं लावता? अशी विचारणा केली आहे.

न्यायमूर्ती जे. अशोक भुषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांनी सुनावणीवेळी विचारणा केली की, जर तुम्ही तीन महिन्यांसाठी कर्ज माफ केलं आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसं काय लावू शकता अशी विचरणा केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे.