मुक्ताईनगर :- तालुक्यातील मेळसांगवे येथील कडू तुकाराम पाटील (55) या शेतकर्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. नापिकीमुळे वाढलेला कर्जाचा डोंगर त्यातच लहान मुलाच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याने व त्याचाही काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्यानंतर कर्जाचा डोंगर वाढत असतानाच त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. पोलीस पाटील संजय पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय अनिल अडकमोल करीत आहेत.