कर्जास कंटाळून सोनोटीच्या शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले

0

बोदवड- विविध कार्यकारी सोसायटीसह खाजगी कर्ज डोईजड झाल्याने तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (45) या शेतकर्‍याने शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून बोदवड पोलिसात या प्रकरणी अनिल प्रल्हाद पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास फौजदार विजेश पाटील करीत आहेत. दरम्यान, शेतकर्‍यावर विविध कार्यकारी सोसायटीचे तसेच काहीकडून घेतलेले कर्ज होते मात्र शेतातील बोअरवेलचे पाणी आटल्याने व कांद्याचे नुकसान झाल्याने कर्जाच्या विवंचनेत शेतकरी वसंत हे 7 रोजी सायंकाळी सात वाजता शेतात गुरांचे जंगली प्राण्यांपासून रक्षणासाठी जातो म्हणून निघाला मात्र शुक्रवारी सकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांनी शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयताच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.