भुसावळ/पाचोरा : तालुक्यातील नाचणखेडा येथील 42 वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. कोमल नारायण महाजन (माळी, 42) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्ज विवंचनेत आत्महत्या
नाचणखेडा येथील कोमल महाजन यांच्यावर खासगी बँकेचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत त्यांनी शुक्रवारी दुपारी 11.30 वाजता त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत कोमल महाजन यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.