डर्बी । भारतीय महिला संघाने इंग्लंडचा पराभव करून महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाने सुरवात केली.याच सामन्यात मिताली राजने या सामन्यात 71 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली. सलग सात सामन्यात मिताली राजने अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या सहा वनडे डावांत मितालीने नाबाद 62, 54, नाबाद 51, नाबाद 73, 64 आणि नाबाद 70 धावा केल्या. महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे. मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाही. मितालीने ठोकलेल्या सात अर्धशकांमध्ये चार अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केली आहे.अर्धशतके करण्यामध्ये कर्णॅधार विराट कोहला ही मागे टाकले आहे मिताली राजे
विराटचे 42 अर्धशतके
कर्णधार मिताली राजने इंग्लंडविरुद्ध 47 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावले. मिताली राजने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला.मिताली राजने सलग 7 वन डे डावांमध्ये 70*, 64, 73*, 51*, 54, 62* आणि 71 धावांची खेळी रचत, महिला क्रिकेटमध्ये 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्येचा विक्रम रचला. *वन डे क्रिकेटमध्ये 47 अर्धशतक ठोकणारी मिताली राज पहिलीच महिला क्रिकेटर बनली आहे. अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत मिताली राज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्याही पुढे आहे.विराटने आतापर्यंत खेळलेल्या 185 वन डे सामन्यात 42 अर्धशतक केले आहेत. दुसरीकडे मिताली राजने 178 सामन्यांमध्येच 47 अर्धशतके पूर्ण केले आहेत. तर तिच्या नावावर 5 शतकांचाही समावेश आहे. विराटच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये एकूण 27 शतके आहेत.