कर्तव्यावरील पोलिसांना चहा बिस्किटांचे वाटप

0

रावेत : शहर अशांतच्या काळात सलग 72 तास कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना पोलिस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशनतर्फे चहा, पाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांना मिनिटभराचीही उसंत मिळाली नव्हती. सतत बंदोबस्त असणार्‍या पोलिसांना जेवण तर सोडा, पण साधा चहाही मिळणे मुश्कील बनले होते. शहराच्या कानाकोपर्‍यात गस्त घालणार्‍या चौकाचौकांत ठिय्या देऊन बसलेल्या पोलिसांच्या मदतीला अससोसिएशन धावले. बंदोबस्तावरील काळात मिळेल ते खाऊन कामाला भिडलेल्या पोलिसांना यामुळे थोडी सहानभूती मिळाली.

याप्रसंगी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, संपर्क प्रमुख हरिष मोरे, व्यापार आघाडी शहराध्यक्ष भावेश दाणी, शुभम चिंचवडे, रवी जाधव, तेजस खेडेकर, ओमकार भोसले उपस्थित होते. सर्वांनी परिसरातील चापेकर चौक, बिजलीनगर चौक, जुना जकात नाका आणि परिसरातील इतर ठिकाणी याठिकाणी जावून हे कार्य केले.