कर्तव्य फाऊंडेशनतर्फे आज सन्मान सोहळा

0

देहू : कर्तव्य फाऊंडेशनच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त  आज शुक्रवारी १३ रोजी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सन्मान करण्यात येणार आहे. देहूगाव येथील सरस्वती लॉन्स येथे सकाळी 9.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मिरचंदानी ट्रस्टचे अध्यक्ष संजय मिरचंदानी, पिंपरी महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, बेंटलर प्रा. लि. चे व्यवस्थापक मेजर विरेंद्र गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पानी फाऊंडेशन अंतर्गत जलसंधारणाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरूड येथील पानी फाऊंडेशन टीम, शैक्षणिक क्षेत्रात खेड मधील सतारकावस्ती, जि. प. शाळा शिक्षक व ग्रामस्थ, वैद्यकीयमध्ये श्री गजानन फाऊंडेशनचे डॉ. श्रीनिवास राव, दुर्ग संवर्धनाबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान, छायाचित्रकार सचिन फुलसुंदर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.