कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महिलांचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

महापौर मुक्ता टिळक, नृत्य अभिनय क्षेत्रात आपली स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आकाशवाणीवर वृत्तनिवेदन करणार्‍या स्वाती महाळंक, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, माजी नगरसेविका डॉ. गीता आफळे, ज्येष्ठ नेत्या डॉ. प्रतिभा लोखंडे, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा पाटील, विधी समिती सभापती शारदा सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, वैभव गोडसे, देवयानी भिंगारकर, सचिन राऊत, अजित कुलथे, राहुल मोकाशी, रोहित कदम, जयवंत पेरकर, निलेश मोटे, सचिन चव्हाण, तन्मय देशपांडे आदी उपस्थित होते.