क्लासिक रॉक कॉफीतर्फे आयोजन
पिंपरी : समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या हेतूने क्लासिक रॉक कॉफी आणि स्टुडिओ अमोल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना पुणेरी सलाम हा पुरस्कार देवून सन्मानित केले. रेखा घोडे यांना साहित्य क्षेत्रासाठी, सामाजिक क्षेत्रासाठी कुंदा संभिसे, लोककलेसाठी भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी, भरतनाट्यमसाठी शुमिता महाजन, जिम्नॅस्टिक आणि योगा गोल्ड मेडलिस्ट अभीश्री राजपूत, स्पीड आइस स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट श्रृती कोतवाल, ग्लॅमर क्षेत्रासाठी इंटरनॅशनल मॉडेल स्वाती जैन व अभिनय क्षेत्रासाठी अॅना जोशी या आठ महिलांना पुणेरी पगडी घालून आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच ह्या कार्यक्रमात ‘मिस आणि मिसेस ग्लॅम फॅशन’ स्पर्धेच्या आंतिम फेरीत मिस गटात संयुक्ता धुलुगडे तर मिसेस गटात दिपिका अवचिते मिस आणि मिसेस ग्लॅम ठरल्या. यातील ‘मिस ग्लॅम फॅशन’ स्पर्धेत सौम्या वर्मा द्वितीय आणि स्नेहल खोमणे तृतीय विजेती ठरली. ‘मिसेस ग्लॅम फॅशन’ गटात शोनी वीर्दी दुसरी तर सीमा जाधव तीसरी विजती ठरली. महिलांनी आपली स्वतःची ओळख बनवणं महत्वाचे आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक इंद्रजीत कडू यांनी व्यक्त केले. यावेळी पी.के. इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे, संजय भिसे, डॉ. हंसराज डेंबरे, आयोजक अमोल मोरे, रौफ शेख आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी फॅशन एक्सपर्ट श्रेया शोरेवाला, डिज़ाइनर लतिका अठवाणी आणि मिस इंडिया इंटरनॅशनल तानिया शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सक्षम आणि क्रियाशील महिलांना आणि नवीन मॉडेल्सला व्यासपीठ मिळण्यासाठी पुणेरी सलाम पुरस्कार आणि ग्लॅम फॅशन स्पर्धा भविष्यात आयोजित करण्यात येईल असे अध्यक्ष अमोल मोरे – रौफ शेख यांनी सांगितले.
मिस गटाचा निकाल पुढीलप्रमाणे
मिस पॉपुलर – पायल कुंभार, मिस रिफ्रेशिन ब्यूटी – करिश्मा अवचिते, मिस कॉन्फिडेंट – पायल पेड्कर, मिस ब्यूटिफुल स्माइल – प्रिया मकासरे, मिस अस्पिरिंग – सोनाली व्हावळ, मिस फ्रेशेर – शिवानी गोसावी, मिस क्यूट – नम्रता संन्यासी, मिस राइज़िंग स्टार – अपूर्वा मिटकर, मिस ऑडिअन्स चॉइस – सौम्य वर्मा आदी मानकरी ठरले.
मिसेस गटाचा निकाल पुढीलप्रमाणे
मिसेस पॉप्युलर – मानसी पाटील, मिसेस रिफ्रेशिन ब्यूटी – माही राजपूत, मिसेस कॉन्फिडेंट – निशा परमार, मिसेस फ्रेशेर – सुनीता बनकर, मिसेस राइज़िंग स्टार – निधी गुप्ता,
मिसेस ऑडिअन्स चॉइस – दिपिका अवचिते आदी मानकरी ठरले. सूत्रसंचालन अमोल मोरे यांनी तर आभार भारती मोरे यांनी मानले.