कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर नव्या खंडपीठासमोर सुनावणी होणार

0

मुंबई: २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप करीत यासंबंधी चौकशीसाठी लेफ्ट. कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी सुप्रीम कोर्टातला याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठातून यू. यू. लळित यांनी अचानक माघार घेतल्याने आज यावर सुनावणी होऊ शकली नाही.

२००८मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्ट. कर्नल पुरोहित हे मुख्य आरोपी असून त्यांच्यावरील मोक्का हटवण्यात आल्याने ते सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. दरम्यान, या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाकडून आपले अपहरण आणि छळ करण्यात आल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे.

सुनावणी करणाऱ्या खंडपीठातून न्या. यू. यू. लळित यांनी अचानक स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नव्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र, ही याचिका कधी होईल याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.