कर्नाटकचे आमदार वास्तव्यास असलेल्या ‘त्या’ हॉटेलबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन !

0

मुंबई: कर्नाटक सरकार संकटात सापडली आहे. १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेस-जेडीएसचे संयुक्त सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, ते मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. या हॉटेलसमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुंबईतील सोफीटेल हॉटेलबाहेर आज काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या निदर्शनांप्रकरणी पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकत्यांना ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यानंतर हे आमदार बंगळुरू येथून निघून थेट मुंबईत आले होते. येथील सोफीटेल हॉटेलमध्ये सदर आमदार वास्तव्यास आहेत. दरम्यान, या आमदारांनी केलेल्या बंडखोरीविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या आमदारांविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी सुरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.