कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसचे जी.परमेश्वरा शपथ घेणार

0

बंगळूर-कर्नाटकात भाजपला १०८ जागा मिळाल्या मात्र त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नसल्याने कॉंग्रेसने जेडीएससोबत निवडणुकीनंतर आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे कुमारस्वामी शपथ घेणार आहे. कॉंग्रेसकडे जेडीएस पेक्षा अधिक जागा असतांनाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्री पद दिले. दरम्यान कॉंग्रेसचे जी. परमेश्वरा यांची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली असून ते देखील आज शपथ घेणार आहे.